A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

SATARA MUNICIPAL COUNCIL

Home/ Departments


Tree And Garden Department


Designation

        :        

HOD

Name

        :        

sudhir chavan

Email

        :        

treedepartment0000@gmail.com

Contact No

        :        

+91 - 9890603951

v सातारा नगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाची माहिती-

     

            सातारा नगरपालिका मालकीची  लहान मोठी  १५ उद्याने  असून  सदर  उद्यानांची  देखभाल  दुरूस्ती, साफसफाई करणे, वृक्षारोपण करून संगोपन करणे इ.कामे वृक्षप्राधिकरण

विभागाकडून केली जातात.

          सदरील अनुषंगिक  कामे करणेकामी  आवश्यक लागणारे  साहित्य खरेदी  करावी  

लागतात.

जुन्या बागांची जोपासना व नवीन बागांच्या विकासाची कामे वृक्षप्राधिकरण विभागाकडे असतात. वृक्षप्राधिकरण विभागाकडून दरवर्षी शहरात नवीन झाडे लावण्यात येतात. वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे सातारा नगरपालिका हद्दी अंतर्गत विविध उद्यानांची देखभाल दुरुस्तीचे काम करणेत येते. सातारा नगरपालिकेमार्फत विविध सार्वजनिक उद्यानांमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी बसविण्यात आली आहेत. सातारा शहरातील उद्यानाचे  क्षेत्र बरेच आहे.                

 

v सातारा नगरपालिका उद्यान विभागाची कार्ये

 

·         सातारा नगरपालिका मालकीचे उद्यानांची दैनंदिन देखभाल-दुरुस्ती करणे.

·         महाराष्ट्र (नागरी) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ ची अंमलबजावणी सातारा नगरपालिका क्षेत्रामध्ये करणे. 

·         सातारा नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक वृक्षतोड व फांद्यातोड, बांधकाम बाधित वृक्षतोड व फांद्यातोड करणेस वृक्षप्राधिकरण समितीची मान्यता घेऊन परवानगी देणे. 

·         सातारा नगरपालिका क्षेत्रातील विनापरवाना वृक्षतोड अथवा फांद्यातोडबाबत दंड व शास्ती करणे. 

·         सातारा शहरामध्ये वृक्षारोपण करणे तसेच वृक्षांचे संवर्धन व जतन करणे. रस्तादुभाजक येथे लावलेल्या वृक्षांची देखभाल करणे.

·         शहरातील असणारे थोर व्यक्ती यांचे पुतळयांची व स्मारकांची देखभाल करणे.

·         वृक्षारोपण करणे कामी सामाजिक संस्था, शाळा, महाविदयालये यांना वृक्ष रोपे पुरविणे.

·         शहरात जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी यासाठी लोकांचे प्रबोधन करणे. अत्यावश्यक सेवा पुरविणे.