A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा



पेन्शन विभाग


पदनाम

        :        

विभाग प्रमुख

नाव

        :        

प्रियांका पाटील

ईमेल

        :        

auditorsataranp@gmail.com

संपर्क क्र

        :        

+91 - 7559359085

  • 1)     महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 मधील तरतुदीनुसार सातारा नगरपरिषदेकडील निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतन व सेवा उपदान, रजारोखीकरण रक्कम अदा करणेत येते.
  • 2)     महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम 1984 मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्ती कर्मचा-यांना अंशराशीकरण रक्कम अदा करणेत येते.
  • 3)     महाराष्ट्र शासन वित्त विभाग व नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून वेळोवेळी पारित होणार शासन निर्णय व परिपत्रके यानुसार निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे पेन्शन विष्यक बाबींची पूर्तता ठेवणेत येते.
  • 4)     सातारा नगरपरिषदेकडील जे अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्ती किंवा दिवंगत होतात त्यांचे निवृत्तीवेतन महाराष्ट्र नागरीसेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 व महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचेकडून वेळोवेळी पारित होणारे शासन निर्णय / परिपत्रक मधील तरतुदींनुसार अदा करणेत येते.
  • 5)     पेन्शन विभागाकडे निवृत्ती वेतनधारक 328 व कुटुंब निवृत्ती वेतनधारक 279 असे एकूण निवृत्ती वेतनधारक 607 आहेत. सदर पेन्शनधारक यांचे दरमहा पेन्शन अदा करणेत येते. सदरची पेन्शन युको बँक शाखा सातारा, बारामती बँक शाखा सातारा, दि कराड अर्बन बँक शाखा सातारा यांचे विविध शाखांमध्ये केले जाते तसेच  निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे निवृत्तीवेतन युको बँकेमार्फत आरटीजीएस केले जाते. 
  • 6)     अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त किंवा दिवंगत झालेनंतर त्यांचे पेन्शन प्रकरण सातारा नगरपरिषद सातारा पेन्शन विभाग यांचेमार्फतच प्रकरण तयार केले जाते.
  • 7)     पेन्शन विभागामार्फत पेन्शन दाखले, पेन्शन विषयक माहिती निवृत्ती वेतन धारकांना पुरविली जाते तसेच पेन्शन बुक, सेवाउपदान रजिस्टर, निवृत्तीवेतन रजिस्टर, चेक रजिस्टर, आवक-जावक रजिस्टर, निवृत्तीवेतन प्रमाणक फाईल वेळोवेळी अद्ययावत केले जाते.
  • 8)     महाराष्ट्र शासन वित्त विभाग व नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून वेळोवेळी पारित होणार शासन निर्णय व परिपत्रके यानुसार सातारा नगरपरिषदेकडील 80 वर्षावरील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारीतप्रमाणे निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन पेन्शन विभागाकडून अदा करणेत येते तसेच पेन्शन विक्रीची मुदत संपलेनंतर पुन्हा पेन्शन विभागाकडून प्रस्थापित करणेत येते.
  • 9)     निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे हयातीचे दाखले दरवर्षी वरील बँकांकडून पाठपुरावा करुन घेतले जातात.