A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा



अंतर्गत लेखापरीक्षण विभाग


पदनाम

        :        

विभागप्रमुख

नाव

        :        

अमृता परदेशी

ईमेल

        :        

auditorsataranp@gmail.com

संपर्क क्र

        :        

+91 - 9432755555

1)अंतर्गत लेखा परीक्षणामध्ये सर्व विभागाकडून येणारी वेगवेगळी देयके तपासणे

2) स्थानिक निधी लेखापरीक्षक अंतर्गत वार्षिक तापसणीवेळी येणारे आक्षेप त्यांची नोंद घेणे

3) नगरपरिषदेच्या उत्पन्न खर्चावर नियंत्रण ठेवणे

4) अर्थसंकल्पात तरतूद करणेत आलेल्या कामांच्या देयकांची तपासणी करणे तसेच ज्यादा खर्च   झालेल्या रक्कमांची देयक देण्यापुर्वी ते समक्ष प्राधिकरणाची मंजूरी घेतलेची खात्री करणे

5) आस्थापना विभागाकडून सर्व वेतन देयके, तसेच मंजूर आकृतीबंधाव्यतिरिक्त इतर कोणत्याही खर्चासाठी रक्कम अदा करणेत आलेली नाही याची खात्री करणे

6) सर्व कामाकरीता झालेल्या खर्चाची इतर देयकांची तपासणी करणे त्याच्या समर्थनार्थ योग्य ती प्रमाणके देण्यात आली आहेत आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजूरीविना मंजूर आराखडे अंदाज यामध्ये कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही  हे पाहणे.

7) वितरीत केलेल्या सर्व पावत्यांची नोंद चलन रजिस्टर मध्ये घेतलेची खात्री करणे

8) नगरपरिषदेने खरेदी केलेल्या मालांची नोंद माल रजिस्टर केलेनंतर देयक अदा करणे

9) तपासलेली देयके लेखे, गोषवारे प्रमाणित करून स्वाक्षरी करतील

10) शासकीय स्थानिक निधी लेखापरिक्षा कार्यालयाने घेतलेले आक्षेप विभागाकडून तयार करून घेवून स्थानिक निधी  लेखापरिक्षा कार्यालयास सादर करणे.

11) रजा / सेवा या संबंधीच्या सर्व प्रश्नांचे नियमानुसार सल्ला देणे आणि उपदान भविष्य निर्वाह निधी अथवा भरपाई यांची तपासणी करणे.

12) महालेखापाल मुंबई यांच्याकडील लेखा आक्षेप यांची उत्तरे संबंधित विभागाकडून करून घेवून महालेखापाल मुंबई यांना सादर करणे

13) अप्रामाणिकपणा, चूक, नियमबाह्यता वा बेकायदेशीरपणा यातून अद्भवणारी संभाव्य हानी वा नुकसानीपासून नगरपरिषदेच्या संरक्षणासाठी उपाययोजना दक्षता सामान्यत घेणे त्याबाबत शिफारस करणे.

14) माहिती अधिकार 2005 कायद्याअंतर्गत आलेल्या अर्जदारांना माहिती देणे त्याअनुषंगाने प्रथम अपिल व्दितीय अपिलासाठी हजर राहणे माहिती देणे.

15) मा. मुख्याधिकारीसाो यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे