अग्निशमन विभाग

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
अमित निकम |
ईमेल |
: |
satarafireservice@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9594581791 |
सातारा नगरपरिषद, सातारा
अग्निशमन केंद्र
अ.क्र. |
फायर स्टेशन |
पत्ता |
1) |
स्टेशन क्रमांक 1 वहुतात्मा स्मारक फायर स्टेशन |
शाहु स्टेडिअम समोर,सातारा. |
2) |
स्टेशन
क्रमांक 2 सदरबाझार फायर स्टेशन |
सदरबझार, सातारा. |
सातारा शहरातील
विविध व्यवसाय, उद्योग यांना लावणेत आलेली अग्निशमन शुल्क
सातारा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या
वतीने शहरात व शहराबाहेर विविध प्रकारची सेवा देणेत येते तसेच शहराअंतर्गत विविध
उद्योग, व्यावसाय, हॉटेल, हॉस्पीटल, चित्रपटगृह, कारखाने इतर सेवा यांची तपासणी करून त्यांना ना हरकत
दाखला देण्यात येतो. याकरिता संबधित व्यवसायधारक यांच्या कडून (महाराष्ट्र
नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 भारतीय उत्स्फोअक कायदा, दि.
गॅस सिलेंडर नियम व दि पेट्रोलियम कायदा 1934 नियम 1976 नुसार) फी व भाडे निश्चित
केले आहेत.
अग्निशमन
विभागाकडील विविध कार्ये
·
14 एप्रिल ते
20 एप्रिल रोजी शहरात अग्नि सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. शहरामधून प्रबोधन
रॅली काढण्यात येते. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी उदा. शाळा, हॉस्पीटल, शासकीय
कार्यालय, रहिवाशी इमारत या ठिकाणी आग प्रतिबंध व जीव सुरक्षा याबाबत
प्रात्यक्षिके व माहिती देण्यात येते.
सातारा शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा
·
सातारा शहराची
लोकसंख्या सन 2011 च्या जणगणने नुसार सातारा शहराची लोकसंख्या 2 लाख जवळपास आहे.
[P.T.O]
·
मागील
पर्जन्यवृष्टीच्या दरम्यानचा अनुभव लक्षात घेता झाडे, झाडांच्या फांद्या रस्त्यावर
पडून वाहतुक कोलमडणे विज विद्युत वाहिनीच्या तारा वर पडून विद्युत वाहिनीचे खांब
रस्त्यावर पडणे तसेच घरावर झाडे पडून मनुष्य व वित हानी होणेची घटना सातारा शहरात
घडलेल्या आहेत. तसेच शहरालगत असणारा नॅशनल हायवे नं.4 यावर आपात्कालीन
परिस्थितीमध्ये गॅस, टँकर ऑईल टँकर केमिकल टँकरचा अपघात होवून त्यावेळी मोठ्या
प्रमाणात इतर वाहनांना हानी होणार नाही यादृष्टीने स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वीत
करण्याची गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो.