A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा



अतिक्रमण विभाग


पदनाम

        :        

विभाग प्रमुख

नाव

        :        

प्रशांत निकम

ईमेल

        :        

atikramandepartment@gmail.com

संपर्क क्र

        :        

+91 - 7083456868

सातारा नगरपरिषद, सातारा

 अतिक्रमण विभाग

  • सातारा नगरपरिषदेकडील अतिक्रमण विभागामार्फत खालीलप्रमाणे कामकाज करणेत येते.
  • नागरिकांनी केलेली अनाधिकृत बांधकामे हटविणे व रस्त्यावर बेकायदेशीर उभारणा-या फेरीवाले यांना हटविणे तसेच रस्त्यावरील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.
  • "फेरीवाला क्षेत्र" व "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करणे व फेरीवाल्यांचे ना- फेरीवाला क्षेत्रामधून फेरीवाला क्षेत्रामध्ये पुर्नवसन करणे.
  • सातारा शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.
  • पदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनाधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.
  • दवाखाने, बसस्थानक, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेंट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.
  • उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे
  • अतिक्रमण विभागामार्फत शहरातील तात्पुरते फ्लेक्स बोर्ड उभारण्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर जागा वापर फी आकारुन परवानगी देणे.
  • अनाधिकृत उभारण्यात आलेल्या कोणत्याही जाहिराती, शुभेच्छा, उद्घाटन इ. चे फलक जप्त करणे व त्यांच्याकडुन दंडात्मक कारवाई सेवाशुल्क वसुल करणे.
  • सातारा शहरामध्ये खाजगी व नगरपरिषदेंच्या जागेवर उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची जाहिरात कर आकारणी करुन ते वसुल करणे.
  • नगरपरिषदेच्या खुल्या जागा, जागा वापर फी ची आकारणी करुन तात्पुरती जागा उपलब्ध करुन देणे.
  • अतिक्रमण विभागामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सव काळात मंडप उभारणेसाठी इतर शासकीय कार्यालयांच्या परवानगी घेऊन परवानगी देणेत येते.